आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडसह पिशोर परिसरात वरुणराजाची दमदार हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- रविवारी दुपारनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. सिल्लोड, वेरूळ, खंडाळा, सोयगाव, पिंपळदरी, अजिंठा भागात वरुणराजा कोसळला. वेरुळला वादळी वार्‍याने अनेक झाडे उन्मळून पडली. दरम्यान, पावसाकडे डोळे लावून
बसलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
तीव्र उन्हामुळे होणार्‍या त्रासापासून सर्वांची सुटका झाली. दुपारनंतर ढग आले व हलक्या सरी पडल्या. सुरुवातीला सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे अन्वी ते पालोद रस्त्यावर झाडे पडली, तर मांडणा येथील घरांवरील पत्रे उडाले. विजा व सोसाट्याचा वाराच जास्त असल्याने म्हणावा तसा पाऊस पडला नाही. लिहाखेडी परिसरात वीज पडल्याने शंकर दगडू डापके यांचा बैल दगावला.

पिशोर परिसरात गारपीट
उंडणगाव-परिसरात रविवारी दीड ते दोन तास वादळी वार्‍यासह गारपीट झाली. या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर अनेक झाडे उन्मळून पडली. या पावसात भगवान चोथे यांच्या दुमजली इमारतीवर टाकलेली पत्रे उडून गेले, तर मांडणा गावातही पत्रे उडून गेले आहेत. अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. त्यातच सिंगल फेजसाठी रोवलेले पोल पहिल्याच पावसात वाकून गेले आहेत.
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात कोळंबी शिवारात गारपीटीने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणीसाठी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.