आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ठिकठिकाणी वीज कोसळून १२ ठार, तर १४ जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड/ यवतमाळ - राज्यात ठिकठिकाणी वीज कोसळून १२ जण ठार, तर १४ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्याच्या काही भागात येत्या तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसाने गुरुवारी विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. नांदेड, यवतमाळ, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात विजा कोसळल्या. नांदेड जिल् ह्यातील भोकर, माहूर तालुक्यात वीज कोसळून तीन महिलांसह एका बालकाचा बळी गेला. यवतमाळ जिल्ह्यात ५, बुलडाणा जिल् ह्यात २, नागपूर जिल् ह्यात १ ठार झाला. दरम्यान, मराठवाड्यात समुद्रसपाटीपासून सुमारे एक ते तीन कि मी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे येत्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याचा अंदाज आहे.