आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rain Water Unite Review All Over The State, Notice By Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील पर्जन्यमापक यंत्रांचा आढावा घेणार, ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनची दखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पर्जन्यमापकावरील नोंदी सुरळीत होतात का, याचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. उस्मानाबादेत ‘दिव्य मराठी’ने पर्जन्यमापकांची स्थिती पुढे आणल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘दिव्य मराठी’ने 28 जुलै 2013 रोजी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील 42 पैकी 20 पर्जन्यमापकांची स्थिती जाणून घेतली होती. या पाहणीमध्ये बहुतांश पर्जन्यमापकांची दुरवस्था असल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी खासगी व्यक्ती नोंदी घेत असून पर्जन्यमापक सुस्थितीत नसणे, खासगी ठिकाणी बसवणे, त्यामध्ये शेवाळ साचणे, बोगस नोंदी दाखवणे, असे धक्कादायक निष्कर्ष निघाले होते. हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सोनारीच्या (ता. परंडा) मंडळ अधिकार्‍याला निलंबित केले असून काही मंडळ अधिकार्‍यांसह तलाठय़ांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, हा विषय माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिला. सभागृहातही त्यांनी याबाबत लक्षवेधीसाठी पत्र दिले होते. त्यांनी बुधवारी महसूलचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्यासोबत चर्चा केली. या वेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्याकडून माहिती घेण्यात आली.

उस्मानाबादसह राज्यातील पर्जन्यमापकाच्या सद्य:स्थितीबाबत तत्काळ आढावा घेण्यात येईल, असे प्रधान सचिवांनी आमदार पाटील यांना सांगितले. ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे महसूलमधील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.