आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीतील राजस्थानचे आरोपी मुद्देमालासह पकडले, 20 लाख रोख, 1 किलो सोने हस्तगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - हैदराबाद येथे घरफोडी करून २० लाखांच्या रोख रकमेसह सोन्या, चांदीचे दागिने घेऊन इंदूरला पळून जाणाऱ्या तीन आरोपींना नांदेड पोलिसांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पकडले. हे सर्व आरोपी राजस्थानमधील टोकू जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय ऐनपुरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 
 
तेलंगणातील हैदराबाद शहराच्या पश्चिम विभागात असलेल्या शाहिनाथगंज येथे चिंडोने ससी, रणवीर ससी, राकेश मीना (तिघेही वय ३५, रा. पोलेदा, ता. देवळी, जि. टोकू, राजस्थान) यानी समीर बक्षे या व्यावसायिकाच्या घरातून २० लाख रुपये रोख. याबरोबरच एक किलो सोन्याचे दागिने, चार किलो चांदीचे दागिने असा ऐवज चोरला होता. ही चोरी करून ते नांदेडमार्गे खासगी ट्रॅव्हल्सने इंदूरला निघाले होते. दरम्यान, हैदराबादचे पोलिस आयुक्त महेंद्र रेड्डी यांनी नांदेडचे पोलिस अधीक्षक संजय ऐनपुरे यांना आरोपींनी केलेला गुन्हा व ते पळून जात असल्याची माहिती दिली. पोलिस अधीक्षक ऐनपुरे यांनी तातडीने सहायक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना ही माहिती दिली व तातडीने आरोपींना जेरबंद करण्यास सांगितले. महेंद्र पंडित यांनी वजिराबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड, उपनिरीक्षक श्रीकांत भराटे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथक गठित केले होते.
बातम्या आणखी आहेत...