आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणखर नेतृत्वाअभावी विकास खुंटला : टोपे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापुर - शहर व परिसर अत्यंत मागासलेला असून कणखर नेतृत्वाअभावी या भागाचा विकास झाला नसल्याची टीका पालकमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली.
बदनापूर तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शेख आयुब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजप, काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा 16 जानेवारी रोजी राष्ट्रवादीत प्रवेश झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की विकासासाठी बदनापूर बसस्थानक, पेजयल योजना, वळण रस्ता आदी महत्त्वाच्या मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आलेली असून येत्या सहा महिन्यांत मागण्या पूर्ण केल्या जातील. शेख अय्युब यांना राष्ट्रवादी पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल. त्यांचा पक्षाला फायदा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आमदार चंद्रकांत दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेख आयुब, गयाबाई भीमराव क-हाळे, बाबूराव चव्हाण, बद्रीनारायण मंत्री, राजू मंत्री, विशाल टाक, संतोष साबळे, मधुकर सूर्यवंशी, खाजा युसूफ पटेल, शेख इब्राहिम, सय्यद नजीर, शेख मुश्ताक, जावेद कुरेशी, लाला खा, अमजद पठाण, माणकचंद कटारिया, अमोल कटारिया, श्याम तापडिया यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शेख आयुब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास राजेश राऊत, बाळासाहेब वाकुळणीकर, रामदास बारगाजे उपस्थित होते. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पडले आहे.