आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajesh Tope Maharashtra Navnirman Sena Workers Fight Eachother, Divya Marathi

राजेश टोपे-मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी, 8 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/घनसावंगी - राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी देवडे हातगाव येथे राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. उमेदवार सुनील आर्दड आणि राजेश टोपे यांच्यासमोरच हा प्रकार घडला. या घटनेत ८ जण जखमी झाले असून पाच वाहनांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच घनसावंगीत पोलिस बंदोबस्त तैनात केला.

राजेश टोपेंच्या प्रचारार्थ देव्हडे हातगावात सायंकाळी ५.३० सभा सुरू होती. या वेळी टोपे यांचे भाषण सुरू होते. याच वेळी मनसेचे उमेदवार सुनील आर्दड यांच्या प्रचारार्थ गावातून कार्यकर्त्यांची रॅली निघाली होती. रॅली सभेच्या जवळ आली असता मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सभास्थळी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.