आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार धनाडेला दहा वर्षे सक्तमजुरी, बीड सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- तत्कालीन उपनगराध्यक्ष नीलेश करांडे यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयाने दिलेला निकाल औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवत आरोपी राजकुमार धनाडेला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

गेवराई येथील तत्कालीन उपनगराध्यक्ष नीलेश करांडे यांची १० जानेवारी २००२ राेजी जिनिंगवरील ग्रेडर राजकुमार धनाडे याने चाकूने हत्या केली होती. बीडचे सत्र न्यायाधीश एम. एच. बेग यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी राजकुमारची निर्दोष मुक्तता केली होती. बीड सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नीलेश यांचे वडील अॅड. लक्ष्मणराव करांडे यांनी अपील दाखल केले. अपिलाची एकत्रित सुनावणी खंडपीठात करण्यात आली. न्या. एस. एस. शिंदे व न्या. ए. वाय. एस. चिमा यांनी राजकुमारला दोषी ठरवत दहा वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अपीलकर्त्यांच्या वतीने व्ही. डी. सपकाळ यांनी बाजू मांडली.