आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता आल्यास मुंडे कृषिमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांची परळीच्या सभेत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ (जि. बीड) - ‘केंद्रात कृषिमंत्र्यांच्या महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. पवार मात्र खुर्चीला चिकटूनच आहेत. मी कृषिमंत्री असतो तर तत्काळ पायउतार झालो असतो,’ अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी शरद पवारांवर टीका केली. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यास गोपीनाथ मुंडे कृषिमंत्री होतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ येथील तोतला मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. राजनाथ म्हणाले की, राजकारण खुर्चीसाठी नव्हे तर देशासाठी झाले पाहिजे. पंचावन्न वर्षांपासून काँग्रेस खुर्चीचे राजकारण करत असल्यामुळे देशाची अधोगती झाली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत शेतकरी आत्महत्या करत असताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार खुर्चीला चिकटून बसलेले आहेत. शेतकर्‍यांच्या वेदनांची दखल घेत पवारांनी राजीनामा दिला असता तरच त्यांना शेतकर्‍यांचे प्रश्न समजले असते. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. याला सोनिया गांधी आणि शरद पवारांचेच सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये, डीएसके भाजपत