पैठण - भारतात लोकशाही केवळ नावालाच असून लोकशाहीमध्ये महत्त्वाची भूमिका असणारा सक्षम विरोधी पक्ष ५६ वर्षांत मिळाला नसल्याने देशामधील समस्या आजही कायम आहेत, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते पैठण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सुनीता राठोड, प्रा. डी. आर. कसाब यांची उपस्थिती होती.
रिपब्लिकन पक्षाचे नेते कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधल्याने ते आता येथील दलित बहुजन समाजाचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, असा आरोपही आंबेडकर यांनी या वेळी केला. रिपाइंचे सगळे गट आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर असून नवीन नेतृत्व पुढे येण्यासाठी ही योग्य संधी व वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.