आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढच्या दसऱ्याला जे महंत असतील तेच बाेलावतील! पंकजांचे महंत बदलाचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवानगडाच्या पायथ्याशी विराट जनसागरासमोर बाेलताना पंकजा मुंडे. छाया : मंदार साबळे - Divya Marathi
भगवानगडाच्या पायथ्याशी विराट जनसागरासमोर बाेलताना पंकजा मुंडे. छाया : मंदार साबळे
भगवानगड - मातृशक्तीच्या प्रेमाने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण झटत आहोत. मात्र, जाणीवपूर्वक त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला तर हीच स्त्रीशक्ती दुर्गेचे रूप घेऊ शकते. पुढच्या दसऱ्याला जो कोणी महंत असतील, ते आपल्याला गडाची कन्या म्हणून सन्मानाने निमंत्रण देतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवीन महंताच्या नियुक्तीचे सूतोवाच केले.
दरम्यान, भगवानबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी पंकजा मंदिरात गेल्यावर आम्हाला आत जाऊ द्या, असे म्हणत समर्थकांनी दगडफेक केली. यामध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक भाविक जखमी झाले. दसरा मेळाव्यानिमीत्त दरवर्षीप्रमाने राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गडाचे महंत डॉ. नामेदव शास्त्री यांनी भाषणबाजीला बंदी केल्यानंतर राज्यभर या निर्णयाचे पडसाद उमटून मेळावा होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश असल्याने गडाच्या पायथ्याला मुख्य सभेचा कार्यक्रम झाला.
यावेळी खासदार प्रीतम मुंडे, खासदार राजू शेट्टी, पालकमंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर, पणनमंत्री सदाभाऊ खोत, आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, मोहन फड, माजी आमदार गोविंद केंदेे, दगडू बडे, अमित पालवे, उपस्थित होते. गडाच्या इतिहासात एवढी गर्दी यापूर्वी दसरा मेळाव्याला कधीही झाली नव्हती. भाविकांचा जनसागर पाहून पंकजा मुंडे उत्साहित झाल्या. ओबीसींचा मेळावा असे स्वरूप राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटवण्यात पंकजा यांना यश आले.
पक्षांतर्गत पक्षाबाहेरील विरोधकांना सुनावत त्या म्हणाल्या, की माझा राजीनामा हेलीकॅप्टरमध्ये सतत तयार असतो. सर्व सामान्य लोकांच्या प्रेमासाठी न्याय हक्कासाठी आपण सत्तेची पर्वा करत नाही. मिळालेली सत्ता सर्वसामान्यांकडून मिळालेली आहे याचे भान मला आहे. मुंडे साहेबांचे नाव घेतल्याशिवाय विरोधकांना कार्यक्रम घेता येत नाही. गेली सहा दशके मराठा आरक्षणासारखाप्रश्न सोडवू शकले नाहीत. ते एका वर्षात सुटावेत, अशी अपेक्षा धरुन टीकेचे लक्ष केले जात आहे.
मराठा आरक्षण लवकरात लवकर मार्गी लागावा, त्या समाजाला आरक्षण मिळावे. न्याय हक्कासाठी झगडणारा कोणताही समाज उपेक्षित रहाता कामा नये, अशी आपली भूमिका आहे. गोपीनाथगड पायरी असून भगवानगड हे शिखर आहे. कधीही या गडाची तुलना होऊ शकत नाही. भगवानगडाबद्दल श्वासात श्वास असेपर्यंत वाईट शब्द कधीही बोलणार नाही.

विराट जनसागर पाहून गहिवरलेल्या शब्दांत पंकजा यांनी अहंकाराचा बुरुज बाजूला सारून भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी भगवान गडावर आले. गडाच्या पायथ्याला सभा घेऊन भगवान भक्तांमध्ये मी बाबांचे रूप पाहिले. या विराट जनसामगरापुढे नतमस्तक होऊन सर्वसामान्य माणसामधले भगवानबाबा आपण बघितले. दिवसभर उपाशीपोटी राहून भाविकांनी माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमाच्या ऋणातून माझ्या कातड्याचे जोडे केले तरी उतराई होऊ शकणार नाही, असे नमूद केले.

एकटेपाडू देणार नाही : शेट्टी-
खासदारराजू शेट्टी म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी अनेक माणसे प्रस्थापितांच्या विरोधात उभी केली. तोच वारसा पंकजा चालवत आहेत. पंकजा यांना राज्याच्या राजकारणात कोणी एकाकी पाडू पहात असेल, तर तुमचा भाऊ या नात्याने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

महिषासूरमर्दिनी व्हा : खोत
सदाभाऊखोत म्हणाले, आम्ही सर्व गोपीनाथ मुुंडेची फौज आहोत. आम्ही गडाला मानतो. परंतु बाबांच्या जवळ असलेल्या दलालांना नाही. कोणी जर म्हणत असेल तर गड माझा आहे, तर ही कष्टकरी जनता गप्प बसणार नाही. गडाच्या रक्षणासाठी पूजा केलेली हत्यारे सुध्दा प्रसंगी अाम्हाला हाती घ्यावी लागतील. मेळाव्यावर बंदी आणून काय साधले? भाविकांची दिशाभूल करणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी पंकजांनी आता महिषासुर मर्दिनीचा अवतार धारण केला आहे.
दगडफेकीतचार पोलिस जखमी
बाबांच्यासमाधीच्या दर्शनासाठी मोठे शक्तिप्रर्दशन करत आलेल्या मुंडे समर्थकांना कसे रोखायचे असा प्रश्न प्रशासनाला पडला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ अर्धा तास हुज्जत घालत गोपीनाथ गडावरून आलेल्या रथाला प्रवेश देण्यावर एकमत झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पंकजांनी वारंवार आवाहन करत जमावाला शांत केले. दर्शनासाठी पंकजाबरोबर आतमध्ये जाऊ द्यावे, असा आग्रह धरत अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लोखंडी कठडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षा यंत्रणांनी अडवताच संतप्त तरुणांनी चपला दगड भिरकावण्यास प्रारंभ केला. त्यात पोलिस कर्मचारी समीर बनसोडे , शंकर वाघमोडे, शैलेश नाईक सर्व (रा. कोल्हाूपूर) सुपडा पाटील (जळगांव) हे पोलिस जखमी झाले असून धावपळीमध्ये काही पोलिस कर्मचारी भाविकांच्या पायावरुन वाहनांची चाके गेली. मंदिराचा संपूर्ण परिसर गड ताब्यात घेेवून प्रशासनाने मुंडे समर्थकांचा प्रतिकार करण्यासाठी आलेल्या महंत समर्थकांनाही पिटाळून लावले. दर्शन घेऊन सभास्थानी जाताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

महंतांनी निमंत्रण दिले, पण पाहुणचार टाळला
प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार गडाच्या पायथ्याशी पंकजांची सभा ठरल्यावर महंत नामदेवशास्त्रींनी गडावर पंकजांच्या स्वागतास आम्ही तयार आहोत. त्यांच्यासाठी जेवणही तयार असल्याचे वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सांगितले. सहा महिन्यांपूर्वी पंकजा गडावर आल्या होत्या. त्या वेळी दोघांमध्ये निर्माण झालेला अबोला वाढलेले अंतर यामुळे आज पंकजा यांनीच महंतांचा पाहुणचार घेण्याचे टाळले.

पोलिसांशी अर्धा तास वादानंतर समाधी दर्शन
महंत नामदेवशास्त्रींच्या दर्शनाला पंकजा मुंडे जाणार की नाही याची प्रचंड उत्सुकता सर्वांनाच होती. अर्धा तास पोलिसांची हुज्जत घातल्यानंतर पंकजा समाधी मंदिराकडे गेल्या आणि बाबांच्या समाधीपुढे नतमस्तक होत त्यांनी सीमोल्लंघन केले. बाहेरील बाजूने महंताच्या दालनाकडे जाण्याचा रस्ता आहे. तेथून जाता पंकजा सरळ सभास्थानाकडे रवाना झाल्या आणि महंतांचे दर्शन घेण्याचे टाळले.
बातम्या आणखी आहेत...