आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, Mahayuti, RPI, Divya Marathi

महायुतीत राज ठाकरेंची गरज नाही -आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - शिवसेना-भाजपसोबत रिपाइं व स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याने ही महायुती आता मजबूत झाली आहे. त्यामुळे महायुतीत मनसेची अर्थात राज ठाकरे यांची अजिबात गरज नाही, असे स्पष्ट मत रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले. रिपाइं युतीसोबत येण्यापूर्वी शिवसेना-भाजपचे काही उमेदवार 2 ते 5 हजार मतांच्या फरकाने पराभूत होत होते. आता त्यात दलित मतांची भर पडणार आहे, असे सांगून राज-गडकरी यांची भेट वैयक्तिक होती, असे मतही त्यांनी मांडले.

विधानसभेच्या 25 जागा द्या- रिपाइंने लोकसभेच्या 3 जागा मागितल्या होत्या. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत आल्याने दोन जागा कमी झाल्या. विधानसभेसाठी मात्र 25 जागा मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे आठवले म्हणाले.


आघाडीच्या प्रचाराचा नारळ सोमवारी बीडमध्ये फुटणार- गोपीनाथ मुंडेंविरुद्ध सुरेश धस यांना तिकीट दिल्यानंतर आता काँग्रेस-राष्टÑवादीच्या प्रचाराचा नारळ 10 मार्चला बीडमध्ये फुटेल. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार व अन्य मंत्री तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार या वेळी उपस्थित राहतील.