आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, RPI, Divya Marathi

आता मोदी लाट नाही, पण सरकार महायुतीचेच येणार - रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे राज्यात मोदी लाट नसली तरी महायुतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे सत्ता आमचीच येणार यात शंका नाही. भाजप- शिवसेनेने जागा वाटपासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा. रिपाइंने ५७ जागांची यादी युतीकडे दिली असून, त्यापैकी २० जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे, अशी माहिती रिपाइं अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

रिपाइंतर्फे बीडमध्ये दुष्काळी मोचार् काढण्यात आला. यानिमित्त खासदार आठवले बीडला आले होते. ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत रिपाइंने तीन जागांची मागणी केली होती. परंतु आम्हाला तेव्हा एकच जागा मिळाली. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी योग्य न्याय दिला जाईल, जागा वाढवून मिळतील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. कॉँग्रेस विरोधी वातावरण होते. दलितांचीही मते महायुतीच्या बाजूने एकगठ्ठा उभी केली. आता विधानसभेला मोदी लाट नाही. आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. राज्यात सरकारही महायुतीचेच येणार आहे. परंतु, लोकसभेएवढ्या फरकाने युतीचे उमेदवार वजियी होतील, असे वातावरण नाही. शिवेसना, भाजपने जागावाटपाचा निर्णय लवकर घ्यावा. रिपाइंने ५७ जागांची यादी दिली असून, किमान वीस जागा मिळण्याची मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

मुंडेंमुळेच मी खासदार
व्यक्तमित्त्व दिलदार, कार्य सर्वसमावेशक असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. मला राज्यसभा मिळवण्याचे काम अवघड होते. त्यांनी प्रयत्न करून भाजपच्या वरिष्ठ पातळीवर भूमिका मांडून आग्रह धरून जागा मिळवून दिली. त्यांच्यामुळेच मी खासदार होऊ शकलो, अशी भावना आठवलेंनी बोलून दाखवली.

या जागांवर दावा करणार
केज, देगलूर, फुलंब्री, औरंगाबाद पश्चमि, गंगाखेड, उमरगा, मोहोळ, माळशरिस, बदनापूर, उदगीर यासह २० जागांवर रिपाइं दावा करणार आहे. यातील काही जागा शिवसेना, भाजपच्या आहेत. त्यांनी समन्वय ठेवून रिपाइंला द्याव्यात, अशी मागणी खासदार आठवले यांनी केली.