आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेने पाठिंबा काढला तरी सरकारला धोका नाही, रामदास आठवले यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही. कारण महाराष्ट्रात भाजपकडे बहुमताइतक्या अामदारांचे संख्याबळ अाहे, त्याचा प्रत्यय राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्वांनाच अाला अाहे. याउपरही आणखी पंधरा ते वीस आमदार कमी पडलेच तर ते मिळवून देण्याची आपली जबाबदारी असेल,’ असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.   
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते शहरात अाले हाेते. ‘भाजप सरकारकडून सर्वसामान्यांसाठी मोठे काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगतिपथावर वाटचाल आहे. २०१९ आणि २०२४ मध्येही केंद्रात भाजप सरकारच सत्तेवर येणार आहे,’ असा विश्वासही अाठवले यांनी व्यक्त केला.  

 
उद्धव ठाकरे वारंवार सरकारचा पाठिंबा काढून घेणार असे सांगत आहेत. मात्र, त्यांनी खरोखरच पाठिंबा काढून घेऊ नये. कारण तसे झाले तरी  भाजप सरकारला धोका नाही. कारण विधानसभेचा कार्यकाळ अजून अडीच वर्षे बाकी अाहे. इतक्यात कुणीही अामदार मध्यावधीला सामाेरे जाण्यास तयार नाही. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी अनेक अामदार फडणवीस यांना पाठिंबा देतील, असा विश्वास अाठवलेंनी व्यक्त केला.  शेतकरी कर्जमाफीचे स्वागत आहे. दलितांची कर्जेही सरकारने माफ करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

आरक्षणाचे महत्त्व मराठा समाजाला उशिरा कळले   
मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्वप्रथम आपण मागणी केली हाेती. सुरुवातीला दलितांप्रमाणे आम्हाला आरक्षण नको, असे मराठा समाज सांगत होता. मात्र त्यांना आरक्षणाचे महत्त्व उशिरा कळले. त्यामुळे आता ते लढा देत आहेत. त्यांच्या मागणीला रिपाइंचा पाठिंबा आहे. मराठा समाजाबरोबरच सर्व जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांनादेखील आरक्षण मिळावे. दिलेले आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी लोकसभेत आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये कायद्याने बदल करावा, असे आठवले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...