आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdev Baba To Provide Water By Tanker To Drought Hit Area In Jalna

रामदेवबाबांकडून जालन्‍यातील दुष्‍काळग्रस्‍त गावाला दोन महिने पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- योगगुरू रामदेवबाबा मंगळवारी उज्जैनपुरी (ता. बदनापूर) येथे येणार आहेत. भारत स्वाभिमान ट्रस्टतर्फे दोन महिने गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून, त्याचे उद्घाटन बाबांच्या हस्ते होईल. उज्जैनपुरीची लोकसंख्या 4 हजार असून सध्या 2 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु ते अपुरे पडते. गावापासून 5 किलोमीटर अंतरावरील विहिरीतून दररोज दोन टँकर पाणी देणार असल्याचे पतंजलीचे जिल्हा प्रभारी किशन डागा यांनी सांगितले. यानिमित्त 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता बाबांचे मार्गदर्शन शिबिर होणार आहे.