आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीचा धर्म पाळणारे वडकुते विधान परिषदेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - पंधरा वर्षांपासून आमदारकीच्या वेटिंग लिस्टवर असलेले शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या विश्वासू सूर्यकांता पाटील यांचे नाव प्रारंभी निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी वडकुते यांना संधी देण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळणार्‍या पाटील यांचा राष्ट्रवादीने पत्ता कट केला आहे.

सूत्रांनुसार, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी राष्ट्रवादीने पाठविलेल्या पहिल्या यादीत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे नाव होते. त्यांच्या सर्मथकांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्हाभरात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला होता. परंतु त्यांच्या नावाला विरोध झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्यांच्या नाराजीत सूर मिसळणारे माजी खासदार शिवाजी माने यांनी तर प्रचारादरम्यान भगवा रुमाल गळ्यात घालून शिवसेनेचा प्रचार केला होता.