आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब - पंचायत समिती उपसभापती लक्ष्मण आडसूळ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह तिघांवर, तर बैठकीत गोंधळ घातल्याप्रकरणी उपसभापती आडसूळ यांच्याविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.


गुरुवारी पंचायत समिती सभागृहात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई निवारणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपसभापती लक्ष्मण आडसूळ यांनी टंचाईसंदर्भात वारंवार बैठका होत आहेत, पण टंचाई निवारणार्थ कुठलीच उपाययोजना होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यावर आमदार पाटील व उपसभापती आडसूळ यांच्यात खडाजंगी झाली. त्या वेळी राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते व्यासपीठावर आल्याने गोंधळ उडाला. त्यानुसार आडसूळ व बळीराम चव्हाण यांनी परस्परविरोधी पोलिस ठाण्यात अर्ज दिले होते. आडसूळ यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शनिवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील, बळीराम चव्हाण, प्रशांत लोंढे, शरद रितापुरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे, तर उपसभापती आडसूळ यांनी पाणीटंचाई निवारणार्थ बैठकीत गोंधळ घातल्याप्रकरणी बळीराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही गुन्हे परस्परविरोधी आहेत.