आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raosaheb Danave Comment On Udhav Thakare Statement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्हीही शेपूट गुंडाळून बसलो नाहीत, योग्य वेळी उत्तर देऊ - रावसाहेब दानवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - ‘योग्यवेळी आम्ही भाजपला उत्तर देऊ, आम्ही शेपूट गुंडाळून बसलो नाहीत,’ या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ‘आम्हीही शेपूट गुंडाळून बसलो नाहीत,’ अशा शब्दांत सोमवारी प्रत्युत्तर दिले.

सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी रावसाहेब दानवे येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत सेनेसोबत युती करायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहेत. केवळ त्यांना प्रदेशाची परवानगी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. यावरून राज्यात सत्तेत असतानाही भाजप-सेनेत सर्व आलबेल नसल्याचे संकेत मिळाले.
चीनमध्ये सत्ताधारी पक्षाचे कोटी सदस्य आहेत. त्यापेक्षा जास्त सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला. राज्यात ३१ मार्चपर्यंत कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. फेब्रुवारीपर्यंत राज्यात ४० लाख सदस्यांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीतही भाजपला यश मिळत आहे. पालघर जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेत भाजपला २१, सेनेला १५ हितेंद्र ठाकूर आघाडीला १० जागा मिळाल्या. मुखेडची निवडणूक दुर्दैवाने आमच्यावर लादली गेली, असेही ते म्हणाले.