आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 लाख मेट्रिक टन धान्य राखीव - रावसाहेब दानवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असली, तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण केंद्र शासनाने दुष्काळाचा सामना करण्यासाठी 50 लाख मेट्रिक टन धान्याचा साठा राखीव ठेवल्याची माहिती केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. सोयगाव येथे कार्यक्रमाला जाण्यापूर्वी अजिंठा येथे झालेल्या सत्कार सोहळ्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुष्काळासंदर्भात वारंवार बैठका घेत असून संकटाच्या काळात गाफील राहू नये तसेच अठरा तास काम करा, अशा सर्वांना सूचना आहेत. दरम्यान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने पन्नास लाख मेट्रिक टन धान्यसाठा राखीव ठेवल्याचे दानवे यांनी या वेळी सांगितले. या वेळी भाजपचे मेघराज चौंडिये, रघुनाथ चव्हाण, अर्जुन राजपूत उपस्थित होते.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)