आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींसोबत काम करणे सोपे नाही, 4 किलो वजन घटले : दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - माझ्या 35 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मला केंद्रात मंत्री होण्याची संधी मिळाली. हे पद मिळाले तेव्हा खूप आनंद झाला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणे सोपी गोष्ट नाही. महिनाभरातील कामाच्या व्यापाने माझे 4 किलो वजन घटले आहे, अशा प्रांजळ शब्दांत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपला अनुभव सांगितला.

वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथे दानवे यांचा शनिवारी नागरी सत्कार झाला. या वेळी ते म्हणाले, मंत्रिपद मिळाल्यानंतर महिनाभरापासून 18-18 तास काम करतो आहे. यामुळे एक पाय जिल्हय़ात, तर एक पाय दिल्लीत अशी कसरत करावी लागते. त्यामुळे नागरी कार्यक्रमात लक्ष देणे शक्य होणार नाही. मोदींनी अनेक बंधने लादली आहेत. नवी कार खरेदी किंवा देशाच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये, यावरही बंधने आहेत. शिवाय खातेनिहाय आढावा घेतला जात असल्याने कामाचा व्याप मोठा आहे. यामुळे मतदारसंघात किंवा घरी जाण्यासही सवड मिळत नाही, असे दानवे या वेळी म्हणाले.

कामकाजाची मोदी स्टाइल अशी..
सकाळी 9 वाजता कामावर

मंत्र्याच्या कामावर मोदींचे बारीक लक्ष असते. मंत्र्यांना सकाळी 9 वाजता कार्यालय गाठावे लागते. येण्याची वेळ आहे, जाण्याची नाही. स्वत: मोदी 18 तास काम करतात. त्यामुळे मंत्री, अधिकार्‍यांची दमछाक होते.

मोदींचा फोन लँडलाइनवर
मंत्री कार्यालयातच आहे की नाही याची खात्री करण्याचीही मोदींची खास पद्धत आहे. लँडलाइनवर संपर्क साधून ते मंत्र्यांशी बोलतात. त्यामुळे दिल्लीत असल्यास मंत्र्यांना कार्यालयात हजर राहावेच लागते.

खासदार खैरे, भाजप पदाधिकार्‍यांची दांडी
दानवे यांच्या सत्कारसमारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव होते. मात्र खैरे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शिवाय गावच्या ग्रामपंचायतीने या समारंभावर बहिष्कार टाकला होता. आयोजकांनी निमंत्रण पत्रिकेत शिवसेना पदाधिकार्‍यांची नावे टाकली, परंतु भाजप पदाधिकार्‍यांची टाकली नाहीत, असा त्यांचा आरोप होता.

रातोरात दिल्ली गाठली
केंद्रात नव्याने मंत्रिपद स्वीकारलेले राज्यातील एक मंत्री मध्यंतरी सत्कारासाठी मुंबईत आले होते. समारंभ आटोपताच रातोरात ते दिल्लीला परतले. याबाबत पुढे विचारले असता मोदी मंत्रालयात फोन करतात, असा किस्सा या मंत्र्यांनीच सांगितला होता.

(डेमो पिक)