आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेतही केंद्राप्रमाणेच सत्ता द्या : रावसाहेब दानवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभेतही जनतेने पुन्हा महायुतीलाच कौल द्यावा,असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. पिंप्रीराजा येथे आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री हरिभाऊ बागडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. भागवत कराड, विलास भुमरे, जि.प.माजी उपाध्यक्ष सुरेंद्र सोळुंके, माजी जिल्हा परिषद सभापती रघुनाथ काळे, सजनराव मते, आसाराम तळेकर आदी उपस्थित होते. पिंप्रीराजा येथे सत्काराच्या कार्यक्रमप्रसंगी 2 कोटी 14 लाख रुपये खर्चाच्या पिंप्रीराजा ते सांजखेडा रस्त्याचे भूमिपूजन केले. तसेच गावातील अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. ते म्हणाले की, तुम्ही मला मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. सरकार व जनतेच्या संपर्कात राहण्याचा आम्हास सूचना आहेत. त्यामुळे मला कुठले खाते मिळाले हे महत्त्वाचे नसून तुमचे काम करण्यास मी सक्षम आहे. तुमच्या विकासासाठी मी केंद्रातून विविध योजनांसाठी निधी मिळवून देऊ शकतो. परंतु काँग्रेस सरकार निधी खर्च करेल की नाही, याबाबत शंका आहे, असे ते म्हणाले.