आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविकसित कामे मार्गी लावणार - रावसाहेब दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाफराबाद - भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अविकसित कामे आपण मंत्रिपदाच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
जाफराबाद येथे स्व. डॉ. प्रवीणकुमार खंडेलवाल औषधी भवनचे भूमिपूजन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. औषधी भवनासाठी विनामोबदला जागा दिल्याबद्दल अनिल खंडेलवाल यांचे कौतुक करून रावसाहेब दानवे म्हणाले, आमची अवस्था आकाशातील पतंगासारखी आहे.कारण पतंगाचा दोर जमिनीवरील माणसाच्या हातात असतो.
मी मंत्री झालो तरी माझी दोरी खेड्यातील माणसांच्या हातात आहे. असे सांगून त्यांनी विरोधकांवरही टिकेची झोड उठवली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष एकनाथ घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र मगर यांनी केले.