आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावकीतील मुलीवर अत्याचार करून खून, जालन्यात चिमुरडीवर अतिप्रसंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- भावकीतील जवळच्या नातेवाइकाच्या वर्षे महिने वयाच्या मुलीवर १८ वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिचा खून केला. या कुकर्मात आरोपीचे पालक, भावांनी त्याला मदत करून चिमुकलीचा मृतदेह पोत्यात लपवून ठेवला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघड झाली. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी शुक्रवारी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे ही घटना घडली. गुरुवारी दुपारी १२ वाजता मुलीस संभाजी क्षीरसागरने चॉकलेटचे अामिष दाखवून भागवत परबती क्षीरसागर (१८) याने त्याच्या घरात नेले. घरात नेल्यावर तिच्यावर अत्याचार केला. यानंतर चिमुकली बेशुद्ध पडल्यावर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचे वडील परबती, आई पंचफुला, भाऊ कवीनारायण, बबन खंडोजी क्षीरसागर, राहुल ऊर्फ सतीश मसाजी क्षीरसागर, शोभाबाई बबन क्षीरसागर या नातेवाइकांच्या मदतीने मृत मुलीचा मृतदेह पोत्यात घालून घरात अंधाऱ्या भागात ठेवला.
मुलीचा दिवसभर शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यानंतर तिचे वडील संभाजी यांनी मिळालेल्या माहितीवरून जुन्या भांडणामुळे त्यांचा शेजारी परबतीवर संशय घेत कळमनुरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कळमनुरीचे पीआय मुकुंद देशमुख यांच्या पथकाने रात्री साडेनऊ वाजता परबतीच्या घराची झडती घेतली असता, मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कवीनारायण वगळता इतर सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सायंकाळी वाजेपर्यंत अटक केली नव्हती. प्रकरणाचा तपास पीआय प्रेमलता गोमासे या करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी शवविच्छेदनानंतर मृत चिमुकलीवर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जालना तालुक्यात साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार
जालना- तालुक्यातील एका गावात साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी रात्री एक वाजता तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी सायंकाळी अंगणात खेळत असताना आरोपीने तिला उचलून घरात नेले तिच्यावर अतिप्रसंग केला. काही वेळाने मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर आईने कुटुंबातील इतर सदस्यांना हा प्रकार सांगितला थेट तालुका पोलिस ठाणे गाठले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील पोलिस उपनिरीक्षक बोईने यांनी तातडीने मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी महिला बालरुग्णालयात नेले. महिला डॉक्टरांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली.