परळी- पत्नीच्या मदतीनेच जन्मदात्याचा स्वत:च्या 22 वर्षीय मुलीवर सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी परळीत उघडकीस आला. या तरुणीने थेट पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे धाव घेऊन कैफियत मांडल्यानंतर त्यांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. यावरून पीडितेच्या आई-वडिलांना अटक केली.
भीमगल्लीत भंगाराचा व्यापारी मुसा खान पठाण राहतो. त्याने पत्नीच्या मदतीने मुलीवर सात वर्षे अत्याचार केला. पीडितेने परळी शहर पोलिसांत 2011 मध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तिची तक्रार दाखल होऊ दिली गेली नव्हती. बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. नंतर तो परळी शहर पोलिसांत वर्ग करण्यात आला. मुसा खान त्याच्या पत्नीस अटक झाली. कोर्टाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
गर्भपातावरून वाद
यासंबंधातून तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यावरून घरात वाद सुरू झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी या तरुणीने बीड गाठले. जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. अनिल पारसकर यांनी परळी पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.