आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर अत्याचार, व्हिडिओ क्लिप तयार केल्याचा धक्कादायक प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तेरावर्षांच्या मुलीवर दोघांनी अत्याचार करून व्हिडिओ क्लिप तयार करत ती गावात पसरवल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील पाली येथे उघडकीस आला. याप्रकरणी रविवारी रात्री बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पाली येथे २८ मे २०१५ रोजी गावातील तेरा वर्षांची मुलगी दुपारी पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. गावातीलच महेश मधुकर नवले अक्षय बापूराव नवले या दोन तरुणांनी तिला महेशच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या वेळी मोबाइलने व्हिडिओ क्लिप तयार केली.
गावात ही क्लिप पसरली. घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला जिवे मारू, अशी धमकी या दोघांनी तिला दिली. शेवटी ितच्या आईने रविवारी बीड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...