आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये १० वीच्या मुलीवर बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणावर ग्रामीण ठाण्यात शनिवारी पॉस्कोअंतर्गत नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यातील शिरापूर धुमाळ येथे दहावीत शिकणाऱ्या पंधरावर्षीय विद्यार्थिनीला गावातील बाजीराव श्रावण पुरी याने नवगण राजुरी गावातून महिनाभरापूर्वी पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. नगर जिल्ह्यातील लोहगाव येथे बाजीराव पुरी हा तरुण विद्यार्थिनीसोबत राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने लोहगावमधून दोघांना ताब्यात घेतले.