आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नऊ जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - तालुक्यातील आळंद-नायगाव गट ग्रामपंचायतीमधील धनशी वस्तीवरील पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीला मागील चार महिन्यांपासून लग्नाचे अामिष दाखवून नऊ आरोपींनी वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना २२ जून रोजी उजेडात आली. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून वडोदबाजार पोलिस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख लतीफ शेख सादेक, शेख करीम शेख सांडू, शेख अमजद शेख इरफान, शेख आसेफ शेख सांडू, शेख करीम शेख हमीद, शेख साबेर शेख शमीम, शेख अफसर शेख यासिन (सर्व रा. धनशी वस्ती,आळंद, ता. फुलंब्री) व शेख इम्रान (रा.पाल, ता. फुलंब्री), शेख समीर (रा. वासडी, ता.कन्नड) अशी आरोपींची नावे आहेत.

पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीने वडोदबाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या नऊ आरोपींनी २६ जानेवारी २०१६ ते २३ जून २०१६ या चार महिन्यांच्या कालावधीत लग्नाचे अामिष दाखवून व जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी घरातून उचलून कपाशीच्या शेतात नेऊन, तर काही वेळेस पाल (ता.फुलंब्री) या गावी नेऊन वरील सर्व आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. सदर बाब कुणाला सांगितली तर जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. वेळोवेळी झालेल्या शारीरिक संबंधातून सदर अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वरील नऊपैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून फुलंब्री न्यायालयात हजर केले असता २८ जूनपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...