आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्यानेच केला मुलीवर अतिप्रसंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र राजूर । पित्यानेच पोटच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे घडली. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
राजूरपासून जवळच असलेल्या पळसखेडा पिंपळे गावातील शेतवस्तीवर परमेश्वर सांडू जाधव (40)याचे घर आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याची 14 वर्षीय मुलगी आणि प}ी सिंधुबाई या दोघीच घरात असताना, परमेश्वरने प}ीला मारहाण करीत घराबाहेर काढले. त्यानंतर मुलीला मारहाण आणि शिवीगाळ करीत तिच्यावर अतिप्रसंग केला.
याप्रकरणी पिडीत मुलगी आणि तिची आई सिंधुबाई यांनी गुरुवारी हसनाबाद पोलिस ठाणे गाठले, त्यांनतर संबंधीत मुलीने पोलिसांना सर्व हकीकत सांगीतली त्यानुसार परमेश्वर विरुध्द बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एफ.सी. मिर्झा पुढील तपास करीत आहे.