आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इभ्रतीसाठी आईने नाकारले, वडिलांनी तर घरच सोडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - बलात्कारामुळे गर्भवती राहिलेली अल्पवयीन मुलगी संकटांचा सामना करीत आहे. बदनामी झाल्यामुळे वडील बेपत्ता झाले आहेत, तर पोटच्या मुलीचा सांभाळ करण्यास आईने नकार दिला त्यामुळे या मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यातील फणेपूर येथे अल्पवयीन मुलीला गावाशेजारच्या शेतात नेऊन 16 एप्रिल रोजी बलात्कार केला, त्यापासून तिला दिवस गेल्याप्रकरणी मुख्य आरोपी सुनील लकडे, त्याचे
साथीदार इस्माईल मुल्ला व कोमलबाई कोनाळे (तिघे रा. फणेपूर) यांच्याविरुद्ध लोहारा पोलिसांत 1 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहेत. मुलीला आम्ही स्वीकारणार नाही, असे तिच्या आईने न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. त्यामुळे शाळेत जाण्याच्या वयात या अल्पवयीन मुलीवर हा दुर्धर प्रसंग ओढवला आहे. गर्भातील मुलींचे संरक्षण करण्यासाठी स्त्री भू्रणहत्येच्या विरोधात कठोर कायदा करून त्याची अंमलबजावणीही कठोरपणे सुरू आहे. गर्भातील मुलीच्या संरक्षणासाठी जसा कायदा केला, त्याप्रमाणे जन्माला आल्यानंतरही तिच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची गरज आहे.
आनंद हिरावला - फणेपूर या लहानशा गावातील दलित वस्तीत आपल्या मुलाबाळांसह या कुटुंबाचा संसार आनंदात सुरू होता, परंतु आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याने ती गरोदर राहिली असल्याचे समजताच पीडित मुलीचा पिता समाजात काय तोंड दाखवायचे म्हणत घर सोडून निघून गेला आहे. आता पीडित मुलगीही बालसुधारगृहात गेल्याने सुखाने सुरू असलेला संसार उद्ध्वस्त झाला आहे. सध्या मुलीची आई दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन येणा-या संकटांना तोंड देत आहे.
संस्था, संघटनांचाही आधार नाही - याप्रकरणी पीडित कुटुंबाच्या मदतीला कोणतीही महिला संस्था, संघटना धाऊन आलेली नाही. महिला संरक्षण अधिकारी म्हणून लोहारा तालुक्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बी. आर. ढवळशंख यांची नियुक्ती असून, त्यांनीही या घटनेकडे पाठ फिरवली आहे.
घटनेशी माझा संबंध नाही - विवाहित महिलेवर झालेल्या अत्याचारासंदर्भात कौटुंबिक अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी माझी नियुक्ती केली आहे. फणेपूर येथील घटनेशी माझा महिला संरक्षण अधिकारी नात्याने संबंध नाही.’’- बी. आर. ढवळशंख, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी