आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
जालना - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या दोघा अारोपींची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेशी संबंधित सविस्तर माहिती व पुरावे संकलित करण्यासाठी आरोपींची स्वतंत्र चौकशी केली जात असून यापूर्वी त्यांनी आणखी कोणते गुन्हे केले का, याबाबतही पोलिस तपास करत आहेत.

६ व ९ जुलै रोजी रात्री एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मुलीला दुसऱ्या वेळेसही अत्याचारास सामोरे जावे लागले होते. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे करीत आहे, तर याप्रकरणातील आरोपींनी यापूर्वीसुद्धा असा गुन्हा केलेला आहे काय, याचाही सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. रविवारी सहायक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रफिक शेख, पोलिस उपनिरीक्षक एस. ए. गोपीनवार यांच्यासह पोलिस कर्मचारीसुद्धा तपासातील नोंदी घेत होते.
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील एका आरोपीवर यापूर्वी चोरीचे काही गुन्हे दाखल असून त्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात यापूर्वीच देण्यात आलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्राथमिक माहिती आयजींकडे
आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी पाठवलेल्या वाचक शाखेच्या पोलिस निरीक्षक शशिकांत सिनगारे यांनी शनिवारी तपासी अधिकाऱ्यांकडून सायंकाळी प्राथमिक माहिती घेतली आहे. पीडित मुलीचा जबाबही यात समाविष्ट आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पीडित मुलगी पालकांसह शनिवारी सायंकाळीच बाहेरगावी गेल्याची सूत्रांची माहिती आहे.