आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरात एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी चंद्रकांत वागलगावे. - Divya Marathi
आरोपी चंद्रकांत वागलगावे.

लातूर- एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार लातुरात समोर आला आहे. पीडित मुली या आपल्या आईसोबत राहतात, त्यांच्या नात्यातील चंद्रकांत वागलगावे (वय 50) याने ओळखीचा फायदा घेत तीनही मुलींशी शारीरिक संबंध ठेवले.

 

लातूर शहरात या तीनही मुली आपल्या आईसोबत राहतात. आरोपीने ओळखीचा फायदा घेत सतरा, चौदा आणि अकरा वर्षांच्या या तीनही मुलींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र सततच्या अत्याचाराला कंटाळून सतरा वर्षांच्या मुलीने गांधी चौक पोलिस स्टेशन गाठले आणि या प्रकाराचा उलगडा झाला.

 

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तीनही मुलींची वैद्यकीय तपासणी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढचा तपास केला जाणार आहे. आरोपीवर कलम 376 (2)(n )कलम 4 ,6 ,8 अंतर्गत पॉक्सो लावण्यात आला आहे. आरोपीला कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...