आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: चुलत दिराकडून महिलेवर बलात्कार, पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद, आरोपी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- पेठ बीड भागातील एका वसतिगृहावर राहणाऱ्या महिलेवर चुलत दिरानेच बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार आहे. 

वाळुंजे (ता. आष्टी) येथील महिला आपल्या कुटुंबासह इमामपूर भागातील एका वसतिगृहात राहत हाेती. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या दरम्यान महिलेचा चुलत दीर आजिनाथ आयन्या भोसले याने महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून दार वाजवले. पती बाहेरून आला, असे वाटून महिलेने दार उघडले असता अजिनाथने महिलेवर बळजबरी करत जिवे मारण्याची धमकी दिली. पती बाहेरून आल्यानंतर महिलेने हा प्रकार त्यांना सांगितला. यावरून पेठ बीड ठाण्यात आजिनाथ आयन्या भाेसले याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला असून तपास पोलिस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड करत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...