आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाड येथे तीन वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- शीतपेयाचे आमिष दाखवून करमाड येथील एका तीनवर्षीय बालिकेवर 32 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी उद्धव (बंटी) मंजितराव काकडे (32) याच्याविरोधात करमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला
असून सोमवारी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी अडीच वाजता आरोपी उद्धव काकडे शेजारी राहणाºया एका तीनवर्षीय बालिकेला शीतपेय पाजण्याचे आमिष दाखवून घेऊन गेला व बलात्कार केला. बलात्कारानंतर बालिका अर्धा तास बेशुद्ध होती. काही वेळानंतर आईने शोधाशोध केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर बालिकेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. या घटनेमुळे करमाड परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने उद्धव काकडे याला अटक केली.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक दुर्गा बारसे, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब मिसाळ, दिलीप चौरे
करीत आहेत.