आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raped; Accused Son In Law In Jail Issue At Hatagava

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, 10 हजार रुपये दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- हदगाव तालुक्यातील गवतवाडी येथील मारुती आनंदराव झळके (२२) या तरुणाला मंगळवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. म्हस्के यांनी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले. त्यास १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दि. ११ जून २०१३ रोजी सकाळी ११ च्या सुमाराला संगीता (नाव बदलले आहे) ही अल्पवयीन मुलगी काकाच्या घराकडे भाजी आणण्यासाठी जात होती. त्या वेळी आरोपी मारुती मागून आला व तिचे तोंड दाबून तिला शेजारी असणा-या कांताबाई शेषराव झळके या महिलेच्या घरात नेले. त्या ठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. घटनेनंतर मुलीने आईवडील व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिला डॉक्टरकडे नेऊन वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक संजीवनी मिरकले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात ६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. बालाजी शिंदे यांनी बाजू मांडली, तर आरोपीचा बचाव अ‍ॅड. आर. जी. परळकर यांनी केला. न्या. म्हस्के यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.