आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंत भय्यू महाराजांतर्फे १३ जणांना नोकरीची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळात मृत्यूला कवटाळलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील १३ जणांना राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी नोकरीची संधी दिली आहे. कुटुंबातील मुलांचे मोफत शिक्षणही केले जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रसंत भय्यू महाराज पुढे सरसावले असून सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून पाच हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केले अाहे. बीड बाजार समितीच्या वतीने ३९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली. शेतकऱ्यांना मानसिक धीर देण्यासाठी जिल्ह्यात त्यांनी शेतकरी संवाद यात्रा काढत शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. भय्यू महाराजांचेही हृदय हेलावले. महाराजांनी १३ कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्यास विविध ठिकाणी नोकरीची संधी दिली आहे. कौठळी तांडा येथील मच्छिंद्र काचगुंडे व गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा भाऊ अनिल चव्हाण या दोघांना मुंबई, औरंगाबाद येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमध्ये तर अंबाजोगाईच्या वाघाळा येथील तुकाराम भगत यास मुंबईत एअरपोर्ट ॲथॉरिटीमध्ये नोकरीला लावले.