आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ रेशनचालकावर कारवाई; अजिंठा पोलिसात गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा- शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा जास्तीचा रेशन माल उचलणार्‍या शिवना येथील रेशनचालकांविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात शुक्रवार, 7 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. रेशन दुकानचालकाने 3 वर्षांत 19 लाखांचा अपहार केल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी समिती नेमून चौकशी केली. त्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवना येथे रेशन दुकान क्रमांक 61 चे चालक शेषराव किसन राऊत याने 1 जानेवारी 2011 ते 30 सप्टेंबर 2012 या कालावधीत एपीएल, बीपीएल अंत्योदय आदी योजनांच्या लाभार्थींसाठी दरमहा परमिटपेक्षा सुमारे 1 लाख 3 हजार 48 रुपयांचे अधिक धान्य उचलल्याचे उपविभागीय अधिकार्‍यांच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर पुरवठा विभागाचे अव्वल कारकून शिवाजी चिंतामण सोनवणे यांनी अजिंठा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी( 7 जून) शेषराव किसन राऊत याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, फौजदार सुभाष कानडजे, पोलिस कर्मचारी शेख रियाज करीत आहेत.

असा उचलला माल
जानेवारी 2011 ते 30 सप्टेंबर 2012 या कालावधीत उचलण्यात आलेला माल खालीलप्रमाणे : परमिट क्षमतेचा माल, एपीएल गहू -397, प्रत्यक्ष उचललेला माल- 510 क्विंटल, 112.20 क्विंटल जास्त. किंमत 75174, बीपीएल गहू 33.60, उचललेला माल 43 क्विंटल, उचललेला जास्तीचा माल 9.40 क्विंटल, किंमत 4230, अंत्योदय गहू परमिट 210, उचलला 200 क्विंटल, बीपीएल तांदूळ, परमिट 21.60, उचलला 27 क्विंटल, जास्तीचा 5.40, किंमत 2970, अंत्योदय तांदूळ 180 परमिट असताना 178 उचलले, साखर 37.48, उचललेली 52.95, जास्तीचे 15.46 क्विंटल, किंमत 20874, एकूण, परमिट 879.68, असताना उचललेला माल 1010.95, असा त्यांनी 142.46 असा जास्तीचा माल उचलला.

दुकानातील कार्डधारकांची संख्या : एपीएल 442, बीपीएल 24, अंत्योदय 150 अशी आहे. यात 43 कार्डधारकांची नावे डबल आहेत.

>‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेले वृत्त हिवाळी अधिवेशनातही गाजले होते
>उपविभागीय अधिकार्‍यांच्या चौकशी समितीत शेषराव राऊ त आढळला दोषी
>142 क्विंटल जास्तीचा उचलला माल