आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratnakar Gutte's Daughter Arrested, Divya Marathi

पैसे वाटणा-या रत्नाकर गुट्टेंच्या मुलीला अटक, गुट्टे रासपचे उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - महिला बचत गटाच्या नावाखाली मतदारांना पैसे वाटप करणा-या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या स्वाती राजेश फड या मुलीसह अन्य दोन महिलांना गंगाखेड पोलिसांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता अटक केली. त्यांच्याजवळून ११ हजार ५०० रुपये जप्त केले.

स्वाती फड (रा. परळी) यांच्यासह मंगल रमेश शेटे व शोभा सदाशिव कुलकर्णी या तिघींवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सध्या लक्ष्मीअस्त्रांचा जोरदार वापर होऊ लागला असून यापूर्वी अपक्ष उमेदवार आमदार सीताराम घनदाट व रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना मतदारांना मतदानासाठी पैशांचे वाटप करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केली होती, तरीही या मतदारसंघात पैसे वाटपाचे प्रकार जोमाने सुरूच असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.