आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओ रायते ‘शौचालय लाभार्थीं’च्या दारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अणदूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते अणदूर येथे शौचालय लाभार्थींच्या घरी पोहाेचले.

येथील ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी (दि.१२) सीईओ रायते यांनी स्वच्छ भारत अभियानाविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची बैठक घेतली.
त्यांनी शौचालयांची उभारणी, अनुदान, बेसलाइन याबाबत मार्गदर्शन केले. अनुदानप्राप्त होण्यासाठी बेसलाइनमधील त्रुटींची दुरुस्ती आवश्यक आहे.
ग्रामसभेत याबाबत ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले. त्यांच्यासोबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिनगिरे, जिल्हा कृषी अधिकारी खोत, गटविकास अधिकारी शिनगारे, विस्तार अधिकारी संजय राऊत, गटशिक्षणाधिकारी सोनवणे उपस्थित होते.
बैठकीनंतर सरपंच सरिता मोकाशे, जिल्हा परिषद सदस्या पार्वती घोडके, बालाजी मोकाशे, पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, अनुराधा पापडे, पौर्णिमा कुलकर्णी, मनोज कस्तुरे, धनराज मुळे, डॉ. नागनाथ कुंभार यांच्यासह शिक्षक कॉलनीतील हरीश सूर्यवंशी, सुरेश कुंभार, अण्णाराव सोनकांबळे व प्रमोद चौधरी यांच्या घरी नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयाचा बांधकाम आराखडा देऊन शुभारंभ करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी सी. एन. लोकरे यांनी कामकाजाबाबत सविस्तर माहिती देऊन १०७० शौचालये उभारली असून उर्वरित शौचालयासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...