आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reaction From Mahatrashtra On Modis Maiden Speech From Lal Killa

पंतप्रधानांच्या हाकेला महाराष्ट्राची साद, स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर जनतेची मते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नाशिक/जळगाव/सोलापूर/अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण अनेक अंगांनी गाजत असले तरी मोदी यांनी जागवलेल्या स्वप्नांना महाराष्ट्राने साद दिली आहे. मोदींनी मांडलेल्या मुद्द्यांवर दै. ‘दिव्य मराठी’ने जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आयातीऐवजी देशातच उत्पादन व्हावे याचे सर्वांनी स्वागत केले. शिवाय आदर्श गाव संकल्पना, मुलींसाठी शौचालये, स्त्री भ्रूणहत्या, मुलांवरील संस्कार आदी विषयांवर लोकांनी मांडलेली मते अशी...

मोदींचे मुद्दे आणि महाराष्ट्रातील चित्र, मतमतांतरे

मेक इन इंडिया : देशातच उत्पादन व्हावे. यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना आवाहन.
औरंगाबाद : अमेरिकी इंटेल, एनईएल कंपन्या येणे शक्य. लष्करी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुट्या भागांचे उत्पादन घेण्यासाठी पोषक.

नाशिक : सिन्नर सेझमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती शक्य. सुरक्षा उपकरणांत वापर होणार्‍या एक्झॉस्टिक मटेरियलची (धातू) निर्मिती होऊ शकते.

जळगाव : जैन उद्योगाने आधीच काम सुरू केले आहे. सोलर पंप विदेशातून आयात करावे लागत होते. आता त्याची निर्मिती सुरू केली.

सोलापूर : चादर, टॉवेल 36 देशांत जाते. कच्च माल उपलब्ध. केंद्राचे प्रोत्साहन मिळाल्यास निर्यात करणारे शहर होईल. रासायनिक उद्योगही शक्य.

अकोला : येथील एमआयडीसाचा विदर्भात दुसरा क्रमांक असूनही सोयी-सुविधा नाहीत. सिंगल विंडो सिस्टिम लागू करण्याची गरज आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा... मोदींच्या इतर काही निर्णयांवरील नागरिकांची मते...