आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आठवड्यांपूर्वी पसार झालेली महिला कैदी अखेर गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- तीन आठवड्यांपूर्वी येथील न्यायालय परिसरातून पोलिसांच्या हाताला हिसका मारून पळून गेलेल्या महिला कैदीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. महिला आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
 
कविता शिवाजी शिंदे (३०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर भावाच्या मुलीस विद्रूप करून भीक मागण्यास लावण्याचा आरोप असून याप्रकरणी तिच्यावर लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात जुलै २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून कविता येथील जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. तिला नऊ जानेवारी रोजी तारखेसाठी न्यायालयात आणण्यात आले होते. त्या वेळी पायऱ्या चढत असताना बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसाच्या हाताला हिसका मारून तिने पळ काढला होता. पळून गेल्याप्रकरणी तिच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहायक निरीक्षक कलटवाड, लक्षमण कोमवाड आदींचे पथक तिच्या मागावर होते. कविता पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या िकनारी फिरत असल्याचे समजले होते.