आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडचे रेकॉर्डब्रेक तापमान; पारा 42.1 सेल्सिअसवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- नांदेड शहरात सोमवारी गेल्या तीन वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातील कमाल तापमान 42.1 से. नोंदवण्यात आले. किमान तापमान 24.5 से. नोंदवण्यात आले.

यावर्षी अधूनमधून पडणारा पाऊस, गारपीट यामुळे मे महिन्यात तापमानात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती, परंतु एप्रिल महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठला. गेल्या तीन वर्षांत एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा एवढा वर चढला नाही. यापुढेही तापमान वाढीची शक्यता असून मे महिन्यात तापमानाचा पारा 44 से. पर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पहाटे 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत थंडी आणि 9 वाजताच कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे तापाचे आजार वाढले आहेत. गेल्या सप्ताहातील हे सर्वाधिक तापमान असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली: 41 अंशांवर: जिल्ह्यातील तापमानाचा पारा 41 अंशांवर गेल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक चांगलेच हैराण झाले.

तापमानात वाढ होईल
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आद्र्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. वातावरण शुष्क झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. येत्या चार-पाच दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे. यावर्षी तापमानात वाढ अपेक्षित असून मे च्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत तापमानाचा पारा 44 से. पर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रा. श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम अंतराळ संशोधन केंद्र