आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुका कृषी अधिका-याकडे सापडले ८० लाखांचे घबाड, लाचलुचपत विभागाची रेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - अनुदानावर मिळणा-या ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरसाठी लाच मागितल्याच्या प्रकारात गुन्हा दाखल असलेल्या मंठा येथील तालुका कृषी अधिका-याच्या घरात जवळपास ८० लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी बरधे यांच्या घराची तपासणी केली. बरधेकडील मालमत्तेत फ्लॅट, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, वाहने आदींचा समावेश आहे.

मंठा येथील तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे यांच्या औरंगाबाद येथील सिडको एन-४ भागातील घराची आणि लॉकरची शनिवारी तपासणी करण्यात आली तेव्हा या मालमत्तांची कागदपत्रे सापडली. जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही तपासणी करण्यात आली. यात पुणे, अमरावती, औरंगाबाद, बारामती येथील मालमत्तांचा समावेश आहे. मालमत्तेच्या संदर्भातील हा अहवाल आता कृषी उपसंचालक औरंगाबाद कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. त्यात संबंधित अधिका-याविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्तावित केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.पोलिस उपाधीक्षक प्रताप शिकारे यांच्या विनंतीवरून अौरंगाबादचे पोलिस उपअधीक्षक पी. पी. कुलकर्णी, पोलिस निरीक्षक अनिता वराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बरधे यांच्याकडील मालमत्तेचा तपशील
बरधे यांच्या घरात जी कागदपत्रे सापडली आहेत त्यात अमरावती येथील शेगाव देवी येथे तीन हजार स्क्वेअर फूट प्लॉट, बारामती येथील काटेफळ येथे १० आर जमीन, पुण्यातील हडपसर येथे ३९ लाख ४५ हजार रुपये किमतीचा फ्लॅट, अमरावतीच्या भाग्योदय बँकेत साडेपाच लाख रुपये, आैरंगाबाद येथील एस.बी.आय.मध्ये ५० हजार रुपयांच्या ठेवी, औरंगाबाद येथील एस.बी.आय.बँकेत १ लाख ६१ हजार रुपये,घरात दोन लाखांची रोख रक्कम,स्वीफ्ट डिझायर आणि स्कूटी पेप गाडी, लॉकरमध्ये आठ लाख रुपये रोख,१० लाख ९ हजार रुपयांचे सोन्याची दागिने आदींचा समावेश आहे.