आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा तुरीचे चांगले उत्पादन; आठवड्यात बंपर अावक !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - येत्या अाठवड्यात अाडत बाजारात नवीन तुरीची अावक सुरू हाेणार असून यंदा चांगल्या उत्पादनामुळे बंपर अावक राहणार असल्याने तुरीचा ताेरा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने अातापासूनच तयारीला लागावे, अशी अपेक्षा शेतकरी अाणि व्यापारी वर्गातून हाेत अाहे.

मागील पाच वर्षांत दुष्काळजन्य स्थितीमुळे तुरीचे पीक फारसे समाधानकारक राहिले नाही. मागील वर्षी तुरीचे उत्पादन कमालीचे घटल्याने तुरीला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर डाळीचे भाव १७० रुपये किलाेपर्यंत पाेहोचले. डाळीचे दर नियंत्रणात अाणण्याचे सरकारने केलेले उपाय मुळात उत्पादनच कमी असल्याने व अायातीत तूर महाग दराने खरेदी केल्यामुळे फाेल ठरले. डाळींची परिस्थिती लक्षात घेत शासनाने शेतकऱ्यांना अावाहन केल्यानंतर प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात पेरा केला. निसर्गाने साथ दिल्यामुळे यंदा बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात तुरीचे बंपर पीक अाले अाहे.
येत्या अाठवड्यापासून बाजारात नव्या तुरीचा श्रीगणेशा हाेणार अाहे. सध्या तुरीला मिनिमम सपाेर्ट प्राइस ४ हजार ६२५ रुपये व ‘बाेनस’ ४२५ रुपये प्रतिक्विंटल असा एकूण हमी भाव ५०५० रुपये जाहीर अाहे. नाफेड व महामंडळामार्फत तूर खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तुरीची माेठ्या प्रमाणात अावक झाल्यानंतर दर्जावरून भाव पाडण्याचे तंत्र सुरू हाेईल, अशी शंका व्यक्त करून मातीमाेल भाव हाेण्याअाधीच सरकारने उपाय करण्याची अावश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे.
देशांतर्गत मालाला चांगला भाव मिळण्यासाठी शासनाने अायातीत तूर खरेदी बंद करून अायात करात वाढ करणे अावश्यक अाहे. त्यामुळे भारतातील उच्च प्रतीची व प्राेटीनयुक्त डाळ प्रमाणित दरात भारतीय ग्राहकांना मिळू शकेल. सामान्य माणसालाही ती परवडेल त्याचबराेबर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अाणि व्यापारातही स्थिरता येऊ शकेल. शासनाने खरेदी करताना याेग्य नियंत्रण ठेवले तर तुरीचे भाव खुल्या बाजारात सहा ते सात हजार रुपये क्विंटलपर्यंत पाेहोचतील. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अाणि व्यापारालाही चालना मिळेल. दरम्यान, तुरीचे येणारे पीक लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी यंत्रणेला अातापासूनच कामाला लागावे लागेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी दिली.

भाव, पेमेंटबाबत दक्षता घ्यावी
शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जाे भाव ठरवून दिला त्या दराने अधिकतम खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करून पेमेंटच्या व्यवस्थेसाठी दक्षता घ्यावी. अन्यथा अांतरराष्ट्रीय बाजारातून नेहमीच खरेदी सुरू ठेवली तर देशांतर्गत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. त्यासाठी ठाेस उपायांची गरज अाहे.
जीवनराव बजगुडे, प्रगतिशील शेतकरी.
शेतमाल खरेदीचे निकष समान हवेत
व्यापार उदीम वाढण्यासाठी शेतमाल खरेदी करतानाचे शासन व व्यापारी यांच्यासाठीचे निकष- नियम समान असले पाहिजेत. अायातीत माल शासनाने घेतला नाही तर देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा याेग्य माेबदला तत्काळ मिळेल. डाळ इंडस्ट्री व अाधारित इतर उद्याेग वाढतील. राेजगारालाही चालना मिळेल - विष्णुदास बियाणी, अाडत व्यापारी.
बातम्या आणखी आहेत...