आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगारातील फ्रिजच्या टाकीचा स्फोट; ४ ठार, एका शरीराच्या झाल्या अक्षरश: चिंध्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - वसमत तालुक्यातील हट्टा येथे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास जनता गॅरेज या वेल्डिंगच्या दुकानात भंगारात निघालेल्या फ्रिजच्या टाकीचा भीषण स्फोट होऊन एका जणाच्या शरीराच्या अक्षरश: चिंध्या झाल्या. तर एका ९ वर्षीय मुलासह तिघांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य एक गंभीर जखमी आहे. दरम्यान, या स्फोटाची तीव्रता पाहता कारणांचा कसून शोध सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी गुलाबमियाँ खां पठाण (६५), त्यांचा मुलगा रहीम (३०) गॅरेजमध्ये काम करत होता. हे दोघे व रहीमचा मुलगा अजीम (९) व नातेवाईक शेख अतीक शेख इसाक (२८) हेदेखील दुकानात होते. भंगारातील फ्रिजमधील गॅसची टाकी कापून काढत असताना अचानक स्फोट चौघेही फेकले गेले. या वेळी दुकानाजवळ असलेले तानाजी हरिभाऊ जाधव (२५) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...