आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Release The Water In Jayakawadi, If Not Then Face Action

जायकवाडीत पाणी सोडा, अन्यथा रोषाचे धनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - राज्यातील पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे. परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. असे असताना जायकवाडी प्रकल्पात केवळ 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समन्यायी पाणीवाटपावर तत्काळ निर्णय घेऊन जायकवाडीच्या वरील भागातून तातडीने पाणी सोडावे, अन्यथा पुढील वर्षात मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. जनतेच्या रोषाला बळी पडावे लागेल, असा इशारा आमदार अमर राजूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. आमदार राजूरकर यांनी बुधवारी हे पत्र प्रसिद्धीला दिले.

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या आग्रही मागणीवरून मराठवाड्यातील सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान घेतली. या बैठकीत समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले. ही बैठक होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. पाऊस परतीच्या मार्गावर आहे. जायकवाडीच्या वर बांधण्यात आलेल्या मधमेश्वर, गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळवंडे व मुळा या धरणांमध्ये क्षमतेइतके पाणी उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.