आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीचे आरडीसी एसीबीच्या जाळ्यात, चेकद्वारे घेतली 50 हजार रुपयाची लाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- मनोरंजन केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी एका लिपिकासह सेवानिवृत्त शिपायाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम प्रथम धनादेशाद्वारे व नंतर या मध्यस्थाच्या माध्यमातून रोख स्वरूपात स्वीकारणारे येथील निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड हे सोमवारी  सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात रंगेहाथ अडकले. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
परभणीपासून जवळच पाथरी रस्त्यावर पारवा येथे एक सेवाभावी संस्था मनोरंजन केंद्र चालवते. या केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या मान्यतेने तो परवाना नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर होणार होता. यासाठी त्यांनी संबंधित संस्थाचालकाकडे २१ मार्च रोजी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावर संबंधिताने पैसे देण्याची तयारी दाखवल्यानंतर बोधवड यांनी परवाना नूतनीकरण करून तो जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई हसनोद्दीन शमशोद्दीन (६०) यांच्यामार्फत संस्थाचालकाच्या घरी पाठवून दिला. शिपायाकडेच लाचेची रक्कम चेक स्वरूपात देण्यास सांगितली.
 
त्याप्रमाणे संस्थाचालकाने ५० हजार रुपयांचा धनादेश श्री बोधवड यांच्या सांगण्यावरून हसनोद्दीन यांच्याकडे दिला. तो धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी बोधवड यांच्याकडे शिपायाने दिल्यानंतर त्यांनी तो कार्यालयातील पेशकार शेख इसरार शेख उस्मान यांच्याकडे देऊन त्याची रोख रक्कम संस्थाचालकाकडून घेण्याचे सांगितले.  याच दरम्यान, संबंधित संस्थाचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली होती.
 
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पेशकार शेख इसरारने तो धनादेश संस्थाचालकाकडे देऊन त्याबदल्यात ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. त्याच वेळी पाळत ठेवून असलेले पोलिस उपअधीक्षक एन.एन.बेंबडे यांच्यासह पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, निरीक्षक दिनकर गावंडे, विवेकानंद भारती यांच्या नेतृत्वातील पथकाने रंगेहाथ पकडले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...