आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूवर बलात्कार करून मारहाणीचा बदला, माय-लेकावर गुन्हा दाखल; दोघेही फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- सासऱ्याने  वर्षभरापूर्वी  केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी जावयाने सासूवर बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाकी येथील पारधी वस्तीवर ३ ऑगस्ट २०१७ रोजी   रात्री साडेदहा वाजता घडली. या प्रकरणी  आष्टी पोलिस ठाण्यात जावयावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेनंतर  दोघे फरार झाले  असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात सासूवर बलात्कार करण्यासाठी आईनेच मुलाला मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

आष्टी  ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वाकी येथील पारधी वस्तीवर  ३ ऑगस्ट  २०१७ रोजी  रात्री साडेदहा एक तरुण व त्याची आई  ( दोघे रा. माहिजळगाव ता.कर्जत जि.अहमदनगर )  हे माय- लेक त्याच्या सासुरवाडीला गेले होते. तरुण  सासूच्या घरात  गेला असता आईने  घराला बाहेरून कडी लावली.   सासऱ्याने  एक वर्षापूर्वी मला का मारले  असा जाब विचारत त्या तरुणाने सासूला मारहाण  करून तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर तुला  जिवे मारेल अशी धमकीही त्याने सासूला दिली. याबाबत सासूने आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार  दिली असून तरुण व त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व स.पो.नि.यशवंत बारवकर यांनी भेट दिली. 

बलात्काराच्या गुन्ह्यानंतर  माय-लेकाला अटक करण्यासाठी आष्टी पोलिस व कडा चौकीचे संयुक्त पथक नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे रवाना झाले आहे. आरोपी माय-लेक फरार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...