आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदळाच्या दरात विक्रमी घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जीवनावश्यक वस्तूंतील खाद्यतेल, साखरेचे भाव उतरण्याबरोबरच तांदळाचेही भाव घसरल्याने दुष्काळाचा मारा झेलणार्‍या सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाढलेले उत्पादन आणि निर्यातीला आलेली मर्यादा आदींमुळे दर कमी झाल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले.

देशातील अनेक भागात तांदळाचे उत्पादन वाढल्याने त्याच्या दराला उतरती कळा लागली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांत बासमती तांदळाचे ९० टक्के उत्पादन होते. ११२१ आणि १५०९ हे बासमतीचे वाण िनर्यात होते. त्यापैकी ९० टक्के वाटा इराक आणि इराणला जातो. परंतु या दोन्ही देशांनी भारतातून येणार्‍या तांदळाला एक्साइज ड्युटी वाढवल्याने आपला माल तिकडे महाग मिळू लागला आहे. परिणामी इकडून होणारी निर्यात जवळपास बंदच करण्यात आली आहे. परिणामी साठा शिल्लक राहिल्याने भाव घसरू लागले आहेत. वर्षभरापासून ही घसरण सुरू आहे. त्यानुसार ११० रुपयांचा बासमती ६० तर ९० ते ८० रुपयांचा बासमती ५० पर्यंत खाली आला आहे. अन्य बासमतीचे भावही १५ ते २० रुपयांनी कमी झाले आहेत.

तांदळात सर्वाधिक मागणी कोलम जातीला आहे. त्याचे बहुतांश उत्पन्न राज्यातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि छत्तीसगडच्या काही भागात होते. यावर्षी तिकडे चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातून त्याचे दर ५५ वरून ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोना मसुरी नावाचा राइस कर्नाटकात उत्पादित होतो. त्यालाही सुगीचे दिवस आल्याने तोही १० रुपयांपर्यंत खाली आला आहे. देशाच्या अन्य राज्यांत उत्पादित होणार्‍या कालीमुंछ, सोना मसुरी, सुगंधी चिन्नूर आदी तांदळाचे उत्पादनही वाढले आहे. साखरही घसरली आहे. राज्यातील मोजक्या कारखान्यांनी सरकारने ठरवून दिलेला दर दिला असला तरी बहुतांश कारखानदारांनी त्याकडे पाठ फिरवल्याने त्याच्या दरात घट आली आहे. ३२ ते ३३ रुपयांपर्यंत गेलेली साखर २५ ते २६ रुपयांवर घसरली आहे. ऊस दराच ितढा सुटला नसल्याने यंदा अनेक शेतकर्‍यांनी गुऱ्हाळाकडे मोर्चा वळवला. परंतु गुळाचेही भाव ३० टक्क्यांनी कमी होत होलसेल बाजारात प्रतिकिलो २० ते २२ रुपयांवर ते आले आहेत.

तांदळाची घसरण
वाण जुने दर नवे दर
बासमती ११० ६०
बासमती ८५ ५०
कोलम ५५ ४०
आंबेमोहर ६० ४०
सोना मसुरी ३५ २५

तांदूळ आणखी स्वस्त होईल
गेल्या वर्षभरापासून तांदूळ दरमहा किलोमागे एक ते दोन रुपयांनी कमी होत आहे. निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास त्याला ब्रेक लागेल. त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा लागणार आहे. कर्नाटकात वर्षातून दोन वेळा तांदळाचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी तांदूळ बाजारात आल्यास दरात आणखी घट होईल. - अशोक अगरवाल, तांदळाचेव्यापारी, लातूर