आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदगीरमध्ये दंगल, जाळपोळ-कर्फ्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - उदगीर शहरात शनिवारी दंगल उसळली. संतप्त जमावाने दगडफेक करून एसटी बसेस आणि खासगी गाड्यांच्या काचा फोडल्या. मोटारसायकली आणि हातगाड्यांची जाळपोळ केली. पोलिसांनी सौम्य लाठीमाराबरोबरच अश्रूधुराचा वापर केला. तणाव वाढल्याने दुपारनंतर संचारबंदी लागू करण्यात आली.

किल्ल्यातील संत उदागीर बाबा समाधी मंदिरावरील ध्वज काढून शुक्रवारी दुसरा ध्वज लावण्यात आला. त्यामुळे तणाव वाढला. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी जमावाने ठाण्यासमोर उपोषणाचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर जमावाने शिवाजी चौकात बस, ठाण्यावर दगडफेक झाली. स्कूलबसच्या काचा फोडल्या. दोन्ही गटांत तणाव वाढला. सात हातगाड्यांची जाळपोळ करण्यात आली. ट्रक, दोन दुचाकी पेटवून देण्यात आल्या. नंतर बाजारपेठ बंद झाली. जखमींना उपचार करून सोडून देण्यात आले. या प्रकरणी 40 जणांना ताब्यात घेण्यात आले. सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना बसने घरी नेऊन सोडण्यात आले.