आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपचे टायर फुटून अपघात; पाच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - बीडहून येणार्‍या भरधाव जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात सहायक फौजदारांसह पाच जण ठार झाले. तर 5 जण गंभीर जखमी आहेत. बरज फाट्याजवळ शनिवारी हा अपघात झाला. जखमींवर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत. केजचे सहा. फौजदार सय्यद इब्राहिम रुस्तुम ऊर्फ पटेल (55, बीड), शबाना तांबोळी (36, केज), शेख शौकत शेख उस्मान (40, बीड), धम्मानंद गायकवाड (24, आहेरवडगाव), आर्शुबा चंदनशिव (60, केज) यांचा मृतांत समावेश आहे.

आशिया इजाज तांबोळी (10, बीड), जावेद अब्दुल कादर (42, केज), शेषराव इनकर (45, उत्तरेश्वर पिंप्री), मजिया जावेद तांबोळी (8, केज), सुखदेव हाके (65, माळेवाडी) गंभीर जखमी झाले. जीपचे मागील उजव्या बाजूचे टायर फुटल्याने जीप उलटून जीप रस्त्याच्या कडेला शेतात गेली.