आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: वाळूच्या ट्रकची प्रवासी वाहनाला धडक; एक ठार, 11 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभारपिंपळगाव- वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने प्रवासी वाहनाला धडक दिल्याने एक जण ठार, तर ११ जण जखमी झाले. घनसावंगी ते कुंभार पिंपळगावदरम्यान सिंदखेडजवळच शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील प्रवासी हे शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेहून परत येत होते. तालुक्यातील उक्कडगाव येथील भाविक शुक्रवारी शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेला गेले होते. शनिवारी ते यात्रेहून त्यांच्या गावी परत येत असताना सिंदखेडजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने (एमएच २१ एक्स ९८७६) त्यांच्या छोटा हत्ती या वाहनाला (एमएच २१ एक्स ५२०८) धडक दिली. यात देविदास वामन वाहुळे (३६) हे जागीच ठार झाले, तर नीलाबाई वाहुळे, शहादेव नाथा वाहुळे, शहादेव आसाराम ठाकर, दत्ता रामभाऊ तौर, दत्ता नाथा वाहुळे, रामनाथ वामन वाहुळे, अर्चना लोखंडे, कांता विश्वनाथ वाहुळे, मीरा नाथा वाहुळे, अरुणा नाथा वाहुळे, पिंटू देविदास वाहुळे हे जखमी झाले. चौघांवर घनसावंगी, तर काही जणांवर जालना औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. 
बातम्या आणखी आहेत...